Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या खेळाडूने संजू सॅमसनसारखा मोठा पराक्रम केला

या खेळाडूने संजू सॅमसनसारखा मोठा पराक्रम केला
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (19:15 IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांची T20I मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाने विजयासह शानदार सुरुवात केली. संजू सॅमसनने पहिल्या T20I सामन्यात झटपट शतक झळकावले. अशाप्रकारे त्याने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये बॅक टू बॅक शतके झळकावून मोठी कामगिरी केली.

संजूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या T20I मध्ये 47 चेंडूत 111 धावांची शानदार खेळी खेळली होती. अशाप्रकारे, संजू हा T20I क्रिकेटच्या सलग दोन डावात शतके ठोकणारा जगातील चौथा आणि भारताकडून पहिला फलंदाज ठरला. आता हाच पराक्रम ऑस्ट्रेलियात पाहायला मिळत आहे.

 महिला बिग बॅश लीग 2024-25 सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा 25 वा सामना 13 नोव्हेंबर रोजी बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळला गेला ज्यामध्ये होबार्ट हरिकेन्स आणि ॲडलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्सने 20 षटकांत 2 गडी गमावून 191 धावा केल्या.

शानदार शतक झळकावणाऱ्या होबार्टच्या या प्रचंड धावसंख्येमध्ये लिझेल लीचे महत्त्वाचे योगदान होते. तिने  59 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. अशाप्रकारे लिझेलने संजू सॅमसनच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा पराक्रम केला.

या स्पर्धेत लिझेल लीचे हे सलग दुसरे शतक आहे. यासह ती महिला बिग बॅश लीगच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi उद्धव ठाकरें हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना पाठीशी घालत आहे म्हणत अमित शहा यांची घणाघात टीका