Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 8 March 2025
webdunia

ट्रेंट बोल्टच्या बॅटने इंग्लंडविरुद्ध चमत्कार केला, मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रम मोडला

ट्रेंट बोल्टच्या बॅटने इंग्लंडविरुद्ध चमत्कार केला, मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रम मोडला
, सोमवार, 13 जून 2022 (20:00 IST)
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ट्रेंट बोल्टने एक खास विक्रम केला. 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सर्वात कमी डावात 623 धावा केल्या आहेत. त्याच्या आधी, श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटीत 623 धावा केल्या होत्या आणि या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.आता बोल्टने धावसंख्येच्या बाबतीत त्याची बरोबरी केली आहे, मात्र बोल्टने हा विक्रम अवघ्या 69 डावांत गाठून मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे. 
 
बोल्टने इंग्लंडविरुद्ध18 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 16 धावांची खेळी खेळली. बोल्टने आपल्या कसोटी कारकिर्दीत 69 सामन्यांत 16.39 च्या सरासरीने 623 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीतही अर्धशतक ठोकले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाल्यास 11व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा बोल्ट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सासू सासऱ्यांना खोलीत बंद करून अल्पवयीन नणंदेला घेऊन नवी नवरी पळाली