Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

USA vs CAN : अमेरिकेने कॅनडाचा सात गडी राखून पराभव केला

USA vs CANADA
, रविवार, 2 जून 2024 (10:22 IST)
ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गौस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सह-यजमान अमेरिकेने ICC T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा सात गडी राखून पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा करत विजयाची नोंद केली. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सने दमदार फलंदाजी करत 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. ॲरॉनने अँड्रिससोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. अँड्रिसनेही 46 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 
 
अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या अ गटातील सामन्यात यजमान संघाचा कर्णधार मोनांक पटेल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नवनीत आणि निकोलस यांनी शानदार खेळी करत कॅनडाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
 
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने 42 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर अँड्रिस आणि ॲरॉनने मिळून डाव सांभाळला आणि दमदार फलंदाजी केली. आरोनने केवळ 22 चेंडूत अर्धशतक केले, जे अमेरिकेसाठी टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs BAN: विश्वचषकापूर्वी, भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा 62 धावांनी पराभव केला