तीन दिवसांचा खेळ धर्मशाला कसोटीच्या झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीवर अजूनही टीका होत आहे. विराटवर टीका करत पुन्हा ऑस्ट्रेलियन माजी कसोटीवीर ब्रॅड हॉजच्या नावाची भर पडली आहे. विराटला तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळं धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती असे कारण आहे. मात्र ब्रॅड हॉजचा आरोप आहे की भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावं म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे.तर विराट जर आय पी एल मध्ये हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात खेळला तर ते खूप वाईट असेल, असं भाष्यही त्यानं केले आहे. त्यामुळे ब्रॅड हॉजच्या नेमका कोणता हेतू साध्य करतोय आय पी एलचे की मागचा राग ही काढतोय असे तरी दिसतय.