rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मग तुम्हीच निवड चांगले खेळाडू - कोहलीचा संताप

virat kohali
, गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:32 IST)
भारतीय संघाने आफ्रिकेत गमावलेली सिरीज यामुळे भारतीय क्रिकेट संघावर आणि  विराट कोहलीवर चांगलीच टीका झाली. मात्र कोहलीचा सुद्धा या प्रश्नामुळे चांगलाच संताप होत आहे. क्रिकेट मध्ये  केपटाऊन पाठोपाठ सेंचुरियन कसोटीतही भारतीय संघाचा दारूण पराभव झाला यामध्ये  भारताला 135  धावांनी  आफ्रिकेच्या संघाने पराभूत केले आणि सिरीज  2-0 अशी विजयी आघाडीकेली. यामध्ये कोहली  पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून पहिल्याच कसोटी मालिका पराभवाचा सामना केला आहे. मात्र या पराभवाचा   परिणाम कोह्लीवर काय झाला हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत दिसले. दक्षिण आफ्रिकेच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर कोहली चांगलाच संतापला होता.पराभवानंतर पत्रकार परिषदेत कोहलीवर एकाहून एक असे माध्यमांनी प्रश्न विचारले आहेत. यात एक प्रश्न असा होता जयामध्ये की  तुम्ही प्रत्येक सामन्यात संघ का बदलतात ? एकच संघ घेऊन मैदानात का नाही उतरत? असा प्रश्न पत्रकाराने कोहलीला विचारला. यावर मात्र कोहली चांगलाच भडकला  सातत्याने बदल करून आम्ही किती सामने जिंकलेत? असा प्रतिप्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना पत्रकाराने तुम्ही जिंकला आहात पण केवळ घरच्या मैदानावर असे दिसते बाहेर नाही. मात्र यावर म्हणाला  सध्या आम्ही  मने जिंकलो आणि केवळ 2 सामने हरलो असं कोहली म्हणाला. जर आम्ही जिंकलो नाही तर तुम्ही सांगा कोणती टीम आम्ही निवडायला हवी असे रागात कोहली म्हणाला त्यांचं भांडण  पाहून मीडिया मॅनेजरने मध्यस्थी केली आहे. यामध्ये  जे फलंदाज होते त्यांनी   योग्य कामगिरी केली नाही असे कोहली म्हणाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लिपकार्ट चा २१ ते २४ जानेवारीदरम्यान सेल