Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहली बनला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

विराट कोहली बनला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
मुंबई , शनिवार, 6 जानेवारी 2018 (10:49 IST)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. कोहली आयपीएलचे सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातून खेळतो. 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोहलीला आयपीएलसाठी 17 कोटी रुपये दिले आहेत. आयपीएल 2018 च्या रिटेन डेडलाइन वर आरसीबीने कोहलीला टीमध्ये कायम ठेवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. आरसीबीसोबत खेळायचे 17 कोटी रुपये घेऊन विराट कोहलीने रायसिंग पुणे सुपरजायंट्‌सने 14.5 कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकले आहे.
 
कोहलीला 17 कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे. बेन स्टोक्सला मागे टाकण्यात कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा सहभाग आहे. धोनी व रोहित शर्माला त्यांच्या टीने 15 कोटी रुपयात रिटेन केले आहे.
 
खेळाडूंना रिटेन करण्यावरून बरीच चर्चा होती, पण ज्या खेळाडूंची जास्त चर्चा होती त्याच खेळाडूंना संघांमध्ये घेण्यात आले आहे. सर्व आयपीएल संघांनी 2018 च्या नव्या मोसमासाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खेळाडूंची ही यादी जाहीर करण्याची डेडलाइन देण्यात आली होती. आता यानंतर 27 आणि 28 जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा 4 ते 27 एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.
 
आयपीएलच्या 11व्या मोसासाठी संघाने कायय न ठेवलेल्या खेळाडूंध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवले आहे.
 
चेन्नई, बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आठही संघांनी कायम ठेवलेले खेळाडू
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, ए.बी. डी'व्हिलिअर्स, सरफराज खान
 
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या
 
दिल्ली डेअरडेव्हिल्स : क्रिस मॉरिस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर
 
कोलकाता नाइट राइडर्स : सुनील नरीन, आंद्रे रसेल
 
सनराइजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्र्वर कुमार  
 
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ 
 
किंग्स इलेव्हन पंजाब : अक्षर पटेल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रजनीकांतला चाहत्यांचा मोठा पाठिंबा