Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडनमधील लेडी ऑफिसर विराटवर फिदा

लंडनमधील लेडी ऑफिसर विराटवर फिदा
लंडन- एका खांद्यावर अत्याधुनिक रायफल, तर दुसर्‍या खांद्यावर टीम इंडियाच्या सुरक्षेची जबाबदारी. पण त्याच वेळी हृद्यात मात्र विराट कोहलीच्या बहारदार फलंदाजीविषयी जपलेले प्रेम. अशी विराटची चाहती पोलिस ऑफिसर सध्या इंग्लंडमध्ये आहे.
 
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या क्रिकेटचा दुनियेत आज बोलबाला आहे. लंडनही त्याला अपवाद नाही. टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी तैनात ब्रिटीश पोलिसांमधली एक महिला ऑफिसर भारतीय कर्णधाराच्या फलंदाजाची विराट चाहती आहे. मॅन्चेस्टरमधल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये 22 मे रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी लंडनमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. इंटेलिजन्समधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये अजूनही आत्मघातकी हल्लयांचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांसाठीची तसेच सहभागी संघांमधल्या खेळाडूंची सुरक्षा हे मोठे आव्हान ठरले आहे.
 
विराट कोहली आणि त्याची टीम इंडिया रविवारी सकाळी केनिंग्टन ओव्हलवरच्या सराव सामन्यासाठी निघाली. त्यावेळी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर शस्त्रसज्ज पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यात एक महिला पोलिस ऑफिसरचाही समावेश होता. विराटने बसमध्ये चढायच्या आधी त्या महिला ऑफिसरशी आवर्जून संवाद साधला. निम्मी टीम इंडिया हॉटेलमधून बाहेर पडल्यावर विराट आला आणि त्या महिला ऑफिसरशी तिच्यावरच्या जबाबदारीविषयी आपुलकीने बातचीत केली. मागून आलेले टीम इंडियाचे शिलेदार आणि स्पोर्ट स्टाफ तिथेच उभे राहून दोघांमधला संवाद ऐकत होते. विराट त्या महिला ऑफिसरशी संवाद साधून पुढे निघाला, त्या वेळी तिच्या चेहर्‍यावर छान स्मित उमटले होते. कारण ती विराटची फॅन आहे. विराट खूपच उत्तम फलंदाज आहे. त्याला भेटून मला मजा आली, असे ही फॅन म्हणाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूर : नांगरे- पाटील यांच्या गाडीला अपघात, ते सुखरुप