विराटने रिंग किस करत साजरे केले शतक

इंग्लंडविरुद्ध खेळताना शतक लावल्यानंतर विराट कोहलीने पत्नी अनुष्काबद्दल प्रेम मैदानातच जाहीर केले. विराटचं प्रेम व्यक्त करण्याचा क्षण कॅमर्‍यात कैद झाला.
 
विराटने इंग्लंडमध्ये पहिला आणि टेस्ट करिअरचा 22 वा शतक लावला. 172 बॉल्सवर हा शतक लावल्यानंतर विराटने आपल्या स्टाइलमध्ये लगेच शर्टाचे बटण उघडून गळ्यातून चेन काढून किस केलं. खरंतर त्या चेनमध्ये अनुष्काने विराटला घातलेली रिंग होती. विराट ही रिंग आपल्या हृद्याजवळ ठेवतात.
 
विवाह दरम्यान अनुष्काने विराटला ही अंगठी भेट दिली होती. परंतू फलंदाजी करताना अंगठी अडण्याची शक्यता असल्यामुळे विराटने ही अंगठी गळ्यातील चेनमध्ये घा‍तली. अशाने ती त्याच्या हृद्याजवळ राहते. विराटला मैदानात यश मिळाल्यावर ते अंगठीला किस करणे विसरत नाही. आणि याच कारणामुळे इंग्लंडच्या मैदानात आपल्या करिअरचा पहिला शतक लावल्यानंतर त्याने लगेच अंगठीला किस केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

पुढील लेख Blue whale challenge नंतर आता Momo Whatsapp वर सुरू सुसाइड गेम