Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटने केले केदारचे कौतुक !

webdunia
कोलकता- इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.
 
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच भारतीय क्रिकेटमधील केदार नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला. तिसर्‍या वनडेत पराभव झाला असला तरी केदार जाधवच्या 90 धावांच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांचे पुरेपुर मनोरंजन झाले. 
 
सामन्यानंतर कोहली म्हणला, आम्ही 173 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी दोन युवा क्रिकेटपटूंनी जबाबदारीने खेळ करताना विजयाच्याजवळ नेले. जाधवने चांगली खेळी केली. गेल्यावर्षी त्याला जास्त सामने खेळता आले नाही मात्र आता त्याने लय मिळवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्यथा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज: दानवे