Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहलीला सर्वत्र धोनीच दिसतो, इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी व्हायरल

virat kohli dhoni
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (16:57 IST)
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात खास नाते आहे. या बद्दल विराट अनेकदा बोलत असतो. विराट कोहलीने पुन्हा एकदा एमएस धोनीची आठवण काढली आहे. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये धोनीला टॅग करत एक फोटो शेअर केला आहे. कोहलीने या स्टोरीत सांगितले की तो धोनीला सर्वत्र दिसतो. कोहलीची ही गोष्ट काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झाली.
 
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये त्याने पाण्याच्या बाटलीचा फोटो शेअर केला आहे. बाटलीच्या स्टिकरवर धोनीचा फोटो आहे. धोनीचा हा फोटो शेअर करत कोहलीने लिहिले की, तो सर्वत्र आहे. अगदी पाण्याच्या बाटलीवरही. या स्टोरीत त्याने धोनीलाही टॅग केले. 
 
दरम्यान कोहलीला अलीकडेच कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली होती. कोहली म्हणाला होता, 'जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा मला फक्त एकाच व्यक्तीकडून संदेश मिळाला, ज्यांच्यासोबत मी यापूर्वी खेळलो आहे, तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. जेव्हाकि अनेकांकडे माझा नंबर होता.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kanpur : पेशंटला चढला प्रेमाचा ताप