Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिनी मोबाइल कंपनी विवोने IPL टायटल प्रायोजकातून माघार घेतले

webdunia
गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (16:36 IST)
भारत आणि चीन यांच्यामधील सीमेवरील येणाऱ्या ताण-तणावाचा परिणाम आता खेळांवर देखील दिसून येत आहे आणि इंडियन प्रीमियर लीग(IPL)च्या टायटल (शीर्षक) प्रायोजकतत्वात चिनी मोबाइल कंपनी विवो (vivo) ने भारतात केला जाणाऱ्या निषेधामुळे आयपीएलच्या 2020 सत्रात टाइटल प्रयोजनातून माघार घेतले आहेत.
 
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने आयपीएलच्या 13वी आवृत्ती 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे करण्याची घोषणा केली आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने गेल्या रविवारी हे जाहीर केले की विवोसह त्याचे सर्व प्रायोजक कायम ठेवले आहे परंतु त्यानंतर देशात बीसीसीआय एकाद्या चिनी कंपनीला आयपीएलचे शीर्षक प्रायोजकतत्व कसे ठेवू शकत या बद्दलचे निषेध नोंदविण्यात आले. तर सीमेवर चीनबरोबर तणावात भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
 
क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार विवोने या सत्रात माघार घेतले आहे. तथापि, बीसीसीआय आणि विवोने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. विवो आयपीएलच्या टाइटल प्रायोजकम्हणून वर्ष 2022 आणि 2023 सत्रात परत येऊ शकेल अशी बातमी आहे. बीसीसीआय 2020 सत्राच्या शीर्षक प्रायोजकासाठी काही दिवसांत निविदा काढणार आहे.
 
विवोने वर्ष 2017 मध्ये, पाच वर्षासाठी (2018 -2022) आयपीएल शीर्षक प्रयोजकतत्वाचा करार 2199 कोटी रुपयांना विकत घेतला. बीसीसीआयला एका सत्रात विवो कडून तब्बल 440 कोटी रुपये मिळतात.
 
जूनमध्ये झालेल्या भारत आणि चीनमधील राजकीय तणावानंतर बीसीसीआयने आयपीएलशी निगडित प्रायोजित कराराचे पुनरवलोकन करणार असे म्हटले होते, परंतु भारतीय मंडळाने कुठल्याही ब्रँडचे नाव घेतले नव्हते.
 
तीन दिवसांपूर्वी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या आपल्या वक्तव्यात  सांगितले आहे की, आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत UAE मध्ये खेळले जाणार आहे आणि विवो याचे  टायटल प्रायोजक असेल.
 
 या दरम्यान बर्‍याच फ्रँचायझी सांगतात की आयपीएलने अद्याप त्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. असे समजले जाते की विवोच्या करारामधून प्रत्येक फ्रँचायझीला 20 कोटी रुपये मिळतात. विवोने 2015 मध्ये दोन वर्षासाठी आयपीएलचे  टायटल  प्रायोजक मिळविले होते आणि ते 2017 मध्ये तब्बल पाच वर्षापर्यंत कायम ठेवले होते. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

आदित्य बिर्ला रुग्णालयातील आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन