Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

हार्दिक पंड्याची नवीन गर्लफ्रेंडची चर्चा, अखेर कोण आहे ही ?

Hardik Pandya And Jasmin Walia
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (14:56 IST)
भारत पाकिस्तान सामना दरम्यान हार्दिक पंड्याच्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या सामान्य दरम्यान एक खास चेहरा देखील चर्चेत होता. या चेहऱ्यावरील आनंदसोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. हिचे नाव आहे जस्मिन वालिया.
ALSO READ: IND vs PAK: विराट पाकिस्तानविरुद्ध पाचव्यांदा ठरला सामनावीर
ही गायिका आणि अभिनेत्री असून हिचे नाव काही काळांपासून हार्दिक पंड्यासोबत जोडले जात आहे. जस्मिन वालिया ही  एक ब्रिटिश भारतीय गायिका आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व आहे. हिने झॅक नाईट सोबत "बॉम डिगी या हिट गाण्याने लोकप्रियता मिळवली. 
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान, जेव्हा हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट घेतली, तेव्हा कॅमेरा प्रेक्षकांकडे वळला आणि जास्मिन वालियाचा आनंद टिपला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे हार्दिक आणि जास्मिनच्या नात्याबद्दलच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. या फोटोनंतर चाहते आता असा अंदाज लावत आहेत की हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आता या अभिनेत्रीला डेट करत आहे का?
हार्दिक पांड्या आणि जॅस्मिन वालिया यांनी दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर ग्रीसमधील एकाच ठिकाणचे फोटो पोस्ट केल्यापासून यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. चाहत्यांनी अंदाज लावणे सुरु केली की हे एकमेकांना डेट  करत आहे. अद्याप दोघांनीही या नात्याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. पण चाहते या नवीन नात्याबद्दल आपापले अंदाज लावत आहे. 
 
 Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई आणि महानगर प्रदेशात तापमानात झपाट्याने वाढ, फेब्रुवारीमध्येच गरम वारे आणि उष्णतेची शक्यता