भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि नृत्यांगना आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की चहलने धनश्रीसोबतचे त्याचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवले आहेत. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अटकळांचा बाजार चांगलाच तापला आहे.
काही काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या चहलने धनश्रीसोबतचे त्याचे फोटो काढून टाकले आहे. मात्र धनश्रीच्या सोशलमिडीया अकाउंटवर चहलसोबतचे फोटो आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना बळ मिळाले आहे. या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की चहल आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊ शकतात. एका सूत्राने सांगितले की, घटस्फोट निश्चित आहे, मात्र अधिकृतपणे त्याची घोषणा कधी होईल हे येणारा काळच सांगेल. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे हे मात्र नक्की. 11 डिसेंबर 2020 रोजी धनश्री आणि चहलचे लग्न झाले.