Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार
, बुधवार, 16 जून 2021 (20:39 IST)
ब्रिस्टल: भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राजने मंगळवारी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध बुधवारी येथे सुरू होणाऱ्या एकदिवसीय कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेटच्या प्रदीर्घ स्वरूपाची तयारी करण्यासाठी तिने इतर क्रिकेटपटूंचा सल्ला घेतला.
 
महिला कसोटी सामने जगभरात दुर्मिळ आहेत आणि 38 वर्षीय मितालीने 12 वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत फक्त 10 कसोटी सामने खेळले आहेत. तिने खेरची कसोटी 2014 मध्ये खेळली होती.
 
सामन्याच्या आदल्या दिवशी मिताली एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत म्हटले, “मी एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांपेक्षा कमी कसोटी सामने खेळले आहेत, मला आणखी कसोटी सामने खेळायला आवडते . या खेळाच्या स्वरूपानुसार माझा खेळ सुधारला आहे की नाही याबद्दल मी विचार करीत नाही परंतु मी पूर्वीसारखी तयारी केली आहे.
 
त्या म्हणाल्या ,आम्ही इतर क्रिकेट पटू बरोबर बोलून त्यांच्या कडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते  कसोटी सामन्याची तयारी कशी करतात .जेणे करून मला या कसोटी सामन्याच्या तयारीला मदत मिळाली.
 
मिताली म्हणाली की युवा खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे वाहिले जावे .अशी तिची इच्छा आहे आणि मी त्यांना खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला देईन
कर्णधार म्हणाल्या ,आम्ही त्यांना सांगू की मोठे प्रारूप कशे खेळले जातात .आणि जो पदार्पण करीत आहे आपण त्याच्या वर अपेक्षांचे ओझे आणि जबाबदाऱ्यांचा दबाब टाकू शकत नाही.
 
भविष्यातील द्विपक्षीय मालिकेत मितालीने तिन्ही फॉर्मेट खेळण्याचे समर्थन केले असून त्या म्हणाल्या की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मैदानावरील कसोटी सामन्यांची सुरुवात आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारत डे-नाईट टेस्ट खेळणार.
 
मिताली म्हणाल्या की आधुनिक क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेट खेळायचे आहे कारण या स्वरुपात खेळाडूच्या कौशल्याची चाचणी केली जाते.
त्या म्हणाल्या, की आम्ही टी-20 एकदिवसीय सामने खेळतो ,कोणास ठाऊक की येत्या काही वर्षात विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाईल.आपण काहीच सांगू शकत नाही.
 
मिताली म्हणाल्या की,ही तर फक्त सुरुवात आहे.अशी आशा करूया द्विपक्षीय मालिका सुरु राहतील जिथे तिन्ही स्वरूपे खेळली जातील.
मिताली म्हणे की फलंदाज आणि गोलंदाजांनी रेड बॉलची सवय होण्यासाठी अधिकाधिक सत्रांचा सराव केला आहे.
त्या म्हणाल्या,आम्ही कसोटीचा सामना आणि मालिकेला घेऊन उत्सुक आहोत.आम्ही इंग्लंडमध्ये 2017 मध्ये अंतिम सामना खेळला होता. हा संघासाठी एक चांगला अनुभव होता आणि बहुतेक खेळाडू त्या संघाचा एक भाग होते, म्हणून त्यांच्याकडे अनुभव आहे. तसेच प्रथमच मालिकेचे गुण असतील म्हणून निश्चितच ही एक रोमांचक मालिका असेल आणि आम्ही त्याबद्दल उत्सुक आहोत. "
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रविशंकर प्रसाद म्हणाले ,ट्विटर IT नियमांचे पालन करण्यात अयशस्वी