विश्वचषकाच्या 29व्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले होते. लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 50 षटकात 9 विकेट गमावत 229 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 101 चेंडूत 87 धावा केल्या. यादरम्यान हिटमॅनने 10 चौकार आणि तीन षटकार मारले.
रोहित शर्माने आपल्या शानदार खेळीत एक विशेष कामगिरी केली. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने 52 कसोटी सामन्यांमध्ये 3677 धावा, 257 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10510 धावा आणि 148 टी-20 सामन्यांमध्ये 3853 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे हिटमॅनने 457 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 18040 धावा केल्या आहेत. 18 हजार धावा पूर्ण करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याच्या नावावर 664 सामन्यात 34357 धावा आहेत. त्याच्यानंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 513 सामन्यात 26121 धावा केल्या आहेत. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडने 509 सामन्यांमध्ये 24208 धावा केल्या आहेत तर माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 424 सामन्यांमध्ये 18575 धावा आहेत.
रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 मध्ये समावेश केला आहे. त्याने सहा सामन्यांत 398 धावा केल्या आहेत. रोहितने 66.33 च्या सरासरीने आणि 119.16 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या विश्वचषकात त्याचे दुसरे शतक झळकावता आले नाही. जर त्याने शतक केले असते तर त्याच्या विश्वचषकाच्या इतिहासात आठ शतके झळकावली असती. सध्या तो सर्वाधिक सात शतके झळकावणारा फलंदाज आहे.