Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल भरविण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल

आयपीएल भरविण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल
आयपीएलचा तेरावा हंगाम 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलण्यात आलेला असला तरी ही स्पर्धा भरविण्यासाठी बीसीसीआयला पुन्हा केंद्र सरकारच्या क्रीडामंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
 
भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी या संदर्भात एक मोठे विधान केले आहे. आयपीएल 29 मार्चपासून सुरु होणार होती. पण 'कोरोना' व्हायरसचा प्रसार पाहता आयपीएल 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण जर बीसीसीआयला आयपीएल खेळवाची असेल तर त्यांना क्रीडा मंत्रालयाच्या   परवानगीशिवाय भारतात खेळवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
क्रीडा मंत्र्यांनीच आयपीएलबाबत मोठे भाष्य केल्यामुळे या स्पर्धेचे औत्सुक्य वाढले आहेत. क्रीडा मंत्र्यांनी जर परवानगी दिली नाही तर बीसीसीआयला आयपीएल भारतात भरवता येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
 
आयपीएलबाबत क्रीडा मंत्री म्हणाले की, भारत सरकार 15 एप्रिलला 'कोरोना' व्हायरसबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. त्यानुसार सर्वांनाच काम करावे लागेल. जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, हे सर्वांचेच म्हणणे आहे. पण ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
 
क्रीडा मंत्री पुढे म्हणाले की, बीसीसीआय ही फक्त क्रिकेट हा खेळ पाहते, अन्य खेळ नाही. सध्या ऑलिम्पिकचा मुद्दाही ऐरणीवर आहे, जे बीसीसीआय पाहत नाही. आम्हाला सर्वच खेळ पाहावे लागतात. हा मुद्दा नागरिकांच्या सुरक्षेबाबत आहे. एका सामन्याला हजारो प्रेक्षक येत असतात. त्यामुळे हा प्रश्न आता फक्त खेळाचा उरलेला नाही तर हा मुद्दा आता देशाचा झालेला आहे. 
 
भारत सरकारने काही नियम काढले आहेत. त्यानुसार 11 मार्चपासून विदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा देण्यात आला नाही. त्यामुळे सधच्या घडीला आयपीएल सुरु झाली तरीविदेशी खेळाडूंचे काय करायचे, हा प्रश्न बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीपुढे नेहमीच असेल. आता आयपीएल 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलली आहे. पण त्यावेळी तरी विदेशी क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार का, हा प्रश्न बीसीसीआयसाठी महत्त्वाचा असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Reliance Jio ची शानदार ऑफर, डबल डेटा प्लस फ्री कॉलिंग