Article Marathi Cricket News %e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8 %e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80 111062800006_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून दुसरी कसोटी!

आजपासून दुसरी कसोटी
आजपासून वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना केन्सींग्टन ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे विंडीजचे मनोधैर्य खचले आहे. दुसरीकडे वन-डे मालिकेतील विजयानंतर कसोटीतही आघाडी घेतल्यामुळे "टीम इंडिया'चे मनोधैर्य वाढलेले आहे. ही कसोटी जिंकून तीन लढतींच्या मालिकेतील विजय निश्‍चित करण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे.

भारताला 1971 पासून येथे सलग पाच कसोटींत पराभव पत्करावा लागला आहे. मुळात 1953 मध्ये येथे प्रथम खेळल्यापासून भारताला 58 वर्षांत एकदाही कसोटी विजय मिळला नाही. भारताला एकूण सात पराभव आणि एकच कसोटी अनिर्णित असे अपयश येथे पत्करावे लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi