Article Marathi Cricket News %e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8 %e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3 %e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be 110120800008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधी पाऊस, नंतर पठाण बरसला!

आधी पाऊस
न्यूझीलंड विरोधातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने व्यत्यय आनल्यानंतर युसूफ पठाणने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने हा सामना जिंकत न्यूझीलंडला चांगलाच धक्का दिला आहे.

पठाणने अवघ्या 79 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पावसामुळे सामना थांबवावा लागला तेव्हा भारतावरील दबाव वाढला होता. 36 षटकात भारताने 212 धावा केल्या होत्या.

यानंतर मात्र सामना सुरु झाल्यावर पठाणने सौरभ तिवारीच्या मदतीने शानदार फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पठाणने या सामन्यात सात चौकार आणि सात षटकार लगावले.

यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनेही मागील सामन्यांतील मरगळ झटकत आक्रमक खेळ केला. फ्रेंकलिनने शानदार 98 धावा केल्याने पाहुण्‍या संघाने भारतापुढ्यात 315 धावांचे लक्ष दिले होते. यातुलनेत भारताची सुरुवात खराब झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi