खेळपट्टी खेळण्यालायक नव्हती- धोनी
नवी दिल्ली , मंगळवार, 29 डिसेंबर 2009 (11:53 IST)
फिरोजशहा कोटलाची खेळपट्टी खरोखरच निकृष्टच होती, अशी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोमवारी प्रतिक्रिया दिली. रविवारी भारतविरूध्द श्रीलंकेचा पाचवा व अंतिम सामना रद्द करण्यात आला होता. सामना रद्द झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा अशी प्रतिक्रिया दिली.खेळपट्टी खेळण्यास लायक नव्हती, एवढे सांगून त्याने आयसीसीच्या कोर्टात चेंडू टाकला. यासंदर्भा तो अधिक बोलला नाही. बांगलादेश दौर्याची तयारी जोरात सुरू असल्याचे ही त्याने यावेळी सांगितले.