Publish Date: Tue, 17 May 2011 (12:01 IST)
Updated Date: Tue, 17 May 2011 (12:01 IST)
झटपट क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांची बरसात होणारच, पण यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गेलने तर महाप्रतापच केलाय. ‘दे घुमाके’ फलंदाजी करीत त्याने षटकारांचा विक्रमच नोंदविला नाही तर आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे विरोधी संघाच्या नजरा आता गेलकडेच आहेत. तोच आपला खरा प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांना वाटत आहे. त्याने सात सामन्यांत संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सात सामन्यांत त्याने तब्बल 32 षटकार ठोकले आहेत. त्यातील काही महत्त्वपूर्ण सामन्यांवर टाकलेली ही नजर..
इंडियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सत्रत झालेल्या लिलावात वेस्ट इंडीजच्या या माजी कर्णधारावर कोणीही बोली लावली नव्हती. जानेवारीमध्ये ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर झालेल्या बिग बॅश ट्वेंटी-2क् स्पर्धेत गेलने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळत 92 धावांची आक्रमक खेळी केली होती. यात त्याने 7 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते. त्याच्या या कामगिरीच्या आधारावरच त्याने फ्रॅँचायझींना आपल्याकडे आकर्षित केले होते.