Article Marathi Cricket News %e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae %e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b %e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%82 %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b2 111042400002_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम जियो हजारों साल

तुम जियो हजारों साल
ND
सचिन रमेश तेंडुलकर आज ३८ वर्षांचा होतोय. यात त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे २२ वर्षांची. 1989 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल ठेवले. भारत असो की पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका असो की ऑस्ट्रेलिया, जेथे जेथे म्हणून क्रिकेट खेळले जाते त्या सर्व देशांत सचिन नावाचा करिष्मा आहे. त्याने किती धावा केल्या, किती विक्रम केले हे महत्वाचे नाही; पण त्याच्याविषयी परदेशातही असलेला आदर त्याची महानता सिद्ध करणारा आहे.

प्रथम श्रेणीत मुंबईकडून पदार्पण करताना गुजरातविरुद्ध शतक.
इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफोर्ड येथे कसोटीतील पहिले शतक
भारताकडून विश्वचषक खेळणारा सर्वात तरुण खेळाडूचा मान.
१९९६ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.
न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद यथे पहिले द्विशतक.
डॉन ब्रॅडमनचा २९ शतकांचा विक्रम मागे टाकला.
एकदिवसीय १५ हजार धावांचा टप्पा पार. कसोटीत ११ हजार धावांचा टप्पा गाठला.
र्ल्डकप जिकला. शतकांच्या महाशतकापासून फक्त एक शतक दूर.

असामान्य आणि अलौकिक गुणवत्ता असलेल्यांना वयाचे, वेळेचे बंधन नसतेच. सचिनबरोबर 1989 मध्ये कसोटी पदार्पण केलेला पाकिस्तानचा वकार युनुस आत्ता केस पिकून प्रशिक्षक झाला आहे; पण सचिन रोज नव्या विक्रमांची गाथा रचत आहे, त्याची गुणवत्ता आणखीनच झळाळून उठत आहे. त्याच्या नावाचा झेंडा नवनव्या यशोशिखरांवर फडकत चालला आहे... देशाला विश्‍वकरंडक मिळवून देण्याचे ते स्वप्न होते. वाढदिवस असलेल्या एप्रिल महिन्यातच हे सुवर्णस्वप्न पूर्ण व्हावे हा दैवाने त्याला दिलेला आशीर्वादच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi