मुंबई- कोलकातामधील न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यावेळी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये दाखल होती. मात्र शमीने एकाही खेळाडूला याबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, सामना झाल्यानंतर त्याने मुलगी रूग्णालयात दाखल असल्याचे मला सांगितले होते, असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले. शमीच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करावे तितके कमी असल्याचेही तो म्हणाला.