Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन तेंडुलकर खोटे बोलतो आहे, चॅपल गुरुजीचा पलटवार

सचिन तेंडुलकर खोटे बोलतो आहे, चॅपल गुरुजीचा पलटवार
सिडनी , बुधवार, 5 नोव्हेंबर 2014 (10:26 IST)
सचिन तेंडुलकर खोटे बोलत आहे. 2007 मधील विश्वचषकाच्यापूर्वी आपण त्याला कर्णधार बनवण्याची ऑफर दिली नसल्याचे ग्रेग चॅपल यांनी म्हटले आहे. सचिन खोटारडा असल्याचे सांगत चॅपल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल होते.   
 
2005 ते 2007 या काळात बीच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिलेले ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कर्णधार चॅपल यांनी सचिनचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. सचिनला राहुल द्रविडच्या जागेवर कर्णधार बनवण्याचा विचार कधीच डोक्यात आला नसल्याचे चॅपल म्हणाले.  
 
चॅपल म्हणाले, सचिनला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाहाण्‍यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा माझ्यासोबत फिजियो आरि असिस्टेंट कोच होते. तेव्हा सचिनच्या घरी त्याला कर्णधार बनवण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नव्हती. सचिन खोटे बोलत आहे. 
 
दरम्यान, सचिन तेंडुलकरने जीवनचरित्र 'प्लेइंग इट माय वे' येत्या सहा नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. त्यापूर्वीच पुस्तकातून काही महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सचिनने आपल्या पुस्तकात ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलवर टीका केली आहे. 
 
चॅपल सांगतील तीच पूर्व दिशा असायची. सगळ्या क्रिकेटपटूंना चॅपल यांचेच ऐकावे लागत होते. चॅपल यांचे चुकीचे निर्णय देखील क्रिकेटपटूंनी मान्य करावे, अशीच त्यांची अपेक्षा होती. चॅपेल यांची दादागिरी कोणत्याही खेळाडुला आवडत नव्हती त्यामुळे खेळाडुंमध्ये वाद वाढले होते, असेही सचिनने लिहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi