Publish Date: Tue, 04 Jan 2011 (17:42 IST)Updated Date: Tue, 04 Jan 2011 (17:41 IST)
ND
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५१वे शतक झळकाविले. सचिनने याच मालिकेत पहिल्या सामन्यात शतक झळकावून शतकांचे अर्धशतक पूर्ण केले होते.
या सामन्यात सचिनने पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना शतकी खेळी केली आहे. त्याने गौतम गंभीरच्या साथीत १७६ धावांची भागिदारी करीत संघाचा डाव सावरला. गंभीर बाद झाल्यानंतर सचिनने झुंज देत शतक पूर्ण केले. त्याने २२० चेंडूत १०४ धावा केल्या