Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धिमान!

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धिमान!
, मंगळवार, 7 एप्रिल 2015 (12:16 IST)
आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धिमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील 3500 मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.

मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून, ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मातेचे दूध पुरेसे मिळणारी मुले मोठी झाल्यानंतर बुद्धीच्या चाचणीत चांगले गुण मिळवू शकतात.

डॉक्टरांचा असा सल्ला असला तरीही अखेरचा निर्णय मातेचा असतो. मुलाला आपले दूध द्यावे की नाही हा निर्णय माताच घेत असते. नव्या अभ्यासाचे निष्कर्ष द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

मुलाच्या बुद्धिमत्तेवर केवळ आईच्या दुधाचा परिणाम होतो असे नाही, त्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात. आईचे शिक्षण, कुटुंबाचे उत्पन्न, जन्माच्या वेळी मुलाचे वजन हेही घटक मुलाच्या विकासात कारणीभूत असतात.

ब्राझीलमधील पेलोटास येथील डॉ. बर्नाडरे लेसा होर्टा यांच्या मते या संशोधनाने आत्मदृष्टी जागृत होते. ज्या मातांचा त्यांनी अभ्यास केला त्यात सर्व स्तरात बाळांना मातेचे दूध देण्याची पद्धत होती.

केवळ श्रीमंत आणि सुशिक्षित महिलाच नव्हे, तर सर्व स्तरातील मुलांना मातेचे दूध दिले जात असे. पण काही मुलांना वर्षभर माता पाजत असत, तर काही मुलांना ते एखादाच महिना मिळत असे. ज्यांना वर्षभर वा त्यापेक्षाही जास्त काळ मातेचे दूध मिळाले, ती मुले अभ्यासात वा बुद्धीच्या चाचण्यात अधिक गुण मिळवतात असे स्पष्ट झाले. त्यांनी शिक्षण चांगले पूर्ण केले आणि त्यांचे उत्पन्नही चांगले होते.

डॉ. होर्टा यांच्या मते मातेच्या दुधाचे लाभ मुलाला दीर्घकाळ मिळतात. कारण मातेच्या दुधात एकत्रित तीव्र स्थूल आम्लांची साखळी मुलांना मिळते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ती अत्यंत आवश्यक असते. आईचे दूध आणि मुलाच्या बुद्धीचा संबंध असतो हे सिद्ध करण्यासाठी या मुद्द्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धिमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi