Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आल्बर्ट आईन्स्टाईन यांचा आज जन्मदिन

आल्बर्ट आईन्स्टाईन यांचा आज जन्मदिन
, शुक्रवार, 14 मार्च 2014 (15:36 IST)
अणुविज्ञानाचे जनक असणार्‍या आल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी दक्षिण जर्मनीतील उल्म शहरात ज्यू कुटुंबात झाला. 
 
सापेक्षतेचा सिद्धांत मांडणार्‍या E=MC2 या त्यांच्या प्रसिद्ध समीकरणावरच कालांतराने अणूचे विभाजन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. 1921 मध्ये  पदार्थविज्ञान शास्त्रातील संशोधनाबद्दल आईन्स्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान म्हणजे निसर्ग व मानव यांना जोडणारा दुवा असे मानणारा शांततावादी शास्त्रज्ञ म्हणून सारे जग या थोर वैज्ञानिकाला ओळखते. 
 
‘दि मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी’, ‘इव्होलूशन ऑफ फिजिक्स’ व ‘आऊट ऑफ माय लेटर इयर्स’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi