Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकमेकांच्या रक्ताने तहान भागविणारे दाम्पत्य

एकमेकांच्या रक्ताने तहान भागविणारे दाम्पत्य
, मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (14:47 IST)
रोज फळांचा रस, शीतपेय वा मद्याचे सेवन करणारे अनेकजण असतील, पण अशाच प्रकारे नियमितपणे मानवी रक्त पिण्याची सवय असलेली व्यक्ती कधी तुम्ही पाहिली आहे का? खरेतर हे ऐकूनच अनेकांना शिसारी येईल. असे फक्त चित्रपटांत पाहण्यास मिळते, मात्र ब्रिटनमधील एक दाम्पत्य वास्तवात रक्तपिसासून वॅम्पायरप्रमाणे एकमेकांचे नियमितपणे रक्त प्राशन करते. लिया बेनिनगॉफ आणि आरो ड्रॅवेन असे या जगावेगळ्य़ा जोडप्याचे नाव आहे. अन्य प्रेमीयुगुलांपेक्षा आपले प्रेम जास्त मजबूत आणि विश्‍वसनीय आहे, हे इतरांना दाखवून देण्याची त्यांची इच्छा होती. या इच्छेतूनच एकमेकांचे रक्त पिण्याची भयंकर योजना त्यांनी आखली. अर्थात हा विचार पहिल्यांदा आरो ड्रॅवेनच्या डोक्यात अवतरला होता. तो त्याने बेनिनगॉफसमोर ठेवल्यानंतर तीही त्यास तयार झाली. बेनिनगॉफ राजी होताच आरोने आपले रक्त काढून तिला पिण्यास दिले. तेव्हापासून आजपर्यंत दर आठवड्याला हे दोघे शरीरातून रक्त काढून एकमेकांना पाजतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi