Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबामांच्या मलियासाठी आला लग्नाचा प्रस्ताव

ओबामांच्या मलियासाठी आला लग्नाचा प्रस्ताव
, शुक्रवार, 29 मे 2015 (14:36 IST)
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मलिया हिच्यासाठी केनियातील वकिलाकडून लग्नाचा प्रस्ताव आला आहे. या वकिलाने मलियाशी लग्न करून देण्याच्या बदल्यात ओबामांना 50 गाई, 70 शेळ्या आणि 30 मेंढय़ा देण्याची तयारी दाखविली आहे. जुलैमध्ये ओबामा केनियाच्या अधिकृत दौर्‍यावर येणार आहेत त्यावेळी हा प्रस्ताव वकीलसाहेब ओबामांपुढे ठेवणार आहेत. केनिया दौर्‍यावर येताना ओबामा मलियाला सोबत आणतील अशी आशा वकीलसाहेबांना वाटते आहे. विशेष म्हणजे ओबामांचे वडीलही केनियन होते.
 
लग्नाचा प्रस्ताव मांडणार्‍या वकिलाने आपले वय जाहीर केलेले नाही. मात्र तो म्हणतो, 2008 सालापासून तो मलियाच्या प्रेमात आहे. त्याने अजून कोणाशीही डेटिंग केलेले नाही. मलियाबरोबर एकनिष्ठेने संसार करायची त्याची इच्छा आहे. तिच्याबरोबर लग्न करण्याची स्वप्ने तो पाहतो आहेच पण केवळ ओबामा श्रीमंत आहेत म्हणून त्याला हा विवाह करायचा नाही. त्याचे प्रेम खरे आहे आणि साध्या राहणीवर त्याचा विश्वास आहे. मलियाला गाईच्या धारा काढणे, स्वयंपाक रांधणे शिकविण्याची त्याची तयारी आहे. आता ओबामांकडून त्याला काय उत्तर येते याची तो प्रतीक्षा करतो आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi