Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा पोहे विक्रीतून महिना 2 लाख कमाई

कांदा पोहे विक्रीतून महिना 2 लाख कमाई
, शनिवार, 10 जानेवारी 2015 (12:56 IST)
रायपूर शहरात अशी एक व्यक्ती आहे, ती डॉक्टर किंवा अभियंता नाही. तसेच त्याने उच्च किंवा एमबीएचे शिक्षण घेतलेले नाही. मात्र, महिना 2 लाख रुपयांची कमाई करीत आहे.
 
राजधानीत जयस्तंभ चौकात साहू जी याने कांदा पोहेची गाडी लावली आहे. या ठेल्याच्या माध्यमातून महिना 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत ही गाडी सुरु असते. या गाडीवर कोणतेही नाव नाही. एक साधी गाडी आहे. मात्र, या गाडीवर पोहे खाण्यासाठी लोकांची गर्दी होते. येथे येणारा ग्राहक हा शेल्फी काढून सोशल मीडियावर टाकतो. त्यामुळे या गाडीची चर्चाही सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. जोरापारा येथील राहणारा साहू येथे अनेक वर्षापासून कांदा पोहे विक्रीचा व्यवसाय करीत आहे. मी घर चालविण्यासाठी पोहे विक्री करण्यास सुरुवात केली. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत हे काम करुन घर खर्च चालवत आहे. मात्र, आता चांगली कमाई होत आहे. 
 
माझ्या नातेवाईकांनीही शहरात पोहे विक्रीच्या गाडय़ा सुरु केल्यात. माझी दिनचर्या पहाटे 4 वाजल्यापासून सुरु होते. घरात पोहे तयार करतो. सकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत चौकात गाडी लावतो. दरदिवशी 20 किलो पोहे तयार केले जातात. एक प्लेट 200 ग्रॅमची असते. याचा हिशोब केला तर 400 प्लेट लोक फस्त करतात. 20 रुपये प्रति प्लेट हिशोब केला तर दिवसाला 8,000 रुपये होतात. सर्व खर्च काढून साहू महिन्याला कमीत कमी 2 लाख रुपये कमवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi