Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुणसूत्रांवर अवलंबून असते डावखुरेपण

गुणसूत्रांवर अवलंबून असते डावखुरेपण

वेबदुनिया

जगात बहुतांश व्यवहार हे उजव्या हाताने केले जातात. मात्र काहीजण आपली सर्वच कामे डाव्या हातांनी करतात. हे कसे घडते याचे कोडे कोणालाच उलगडत नाही. शास्त्रज्ञांनी हे गुपित उघडण्याचा चंग बांधला. त्यांचे संशोधन मानवी शरीरातील गुणसूत्रे ही त्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

नुकतेच संशोधकांनी लावलेल्या एका संशोधनामध्ये मनुष्य उजव्या किंवा डावखुरा असणे हे पूर्णपणे गुणसूत्रांचा प्रभाव असल्याचे समोर आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक अँन्ड्रय़ू ब्रिस्टॉल आणि हॉलंडमधील मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूटमधील संशोधकांच्या संशोधनानुसार गर्भाशामध्ये विकसित होत असलेल्या गर्भाच्या गुणसूत्रात असमतोलपणा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधित व्यक्ती डावखुरी किंवा उजवी होण्यावर होतो. मेंदूला डावे व उजवे यातील फरक जाणून घेण्यासाठीही गुणसूत्रांची मदत होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सेंट अँड्रय़ू विद्यापीठातील डॉ. सिल्विया पराचिनी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.

गुणसूत्रांचा जैविक प्रक्रिमेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. गर्भाशय हे पेशींनी तार झालेला एक गोल असतो. यात गर्भ विकसित होताना उजवा किंवा डावखुरा होत असतो, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैद्यकीय संशोधन गुणसूत्र विभागाचे प्रमुख विलियम ब्रॅडलर यांनी सांगितले. डावे किंवा उजवे ठरण्याची प्रक्रिया ही ‘पीसीएसके-6’ या गुणसूत्रावरून ठरत असते. हे गुणसूत्र अस्थिर असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या गुणसूत्रावरून झालेल्या संशोधनातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. शरीरात विचित्र (अँबनॉर्मल) परिस्थिती निर्माण होण्यास हे गुणसूत्र कारणीभूत असते. काहीजणांचे हृदय उजव्या बाजूला आणि यकृताच्या बाजूला असल्याच्या घटना दिसून येतात. त्याला ‘पीसीएसकेएस-6’ हे गुणसूत्र कारणीभूत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले. हे संशोधन प्लोस जेनेटिकमध्ये प्रकाशित झालेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi