Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चुगल्या करण्याचा असाही फायदा

चुगल्या करण्याचा असाही फायदा

वेबदुनिया

ND
सर्वसामान्यापणे एकमेकांच्या चुगल्या करणे वाईट प्रवृत्तीचे द्योतक मानले जात, पण विज्ञानमात्र तसे मानत नाही. एकमेकांच्या चुगल्या केल्याने व्यक्तीचे स्वास्थ्य तर चांगले राहतेच, पण त्यामुळे व्यक्तीच्या वाईट सवयींनादेखील लगाम बसतो, असा दावा वैद्यकीय चिकित्सकांनी केला आहे. दरम्यान, चुगल्यांना वैद्यकीय अधिष्ठान देणारे हे जगातील पहिलेच संशोधन असल्याचे सांगितले जाते. 'बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया' विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली.

विशेष म्हणजे एकमेकांच्या चुगल्या केल्याने सामाजिक जीवनदेखील निरामय होण्यास हातभार लागत असल्याचा अजब दावा 'जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी'या नियतकालिकातील प्रसिद्ध लेखात करण्यात आला आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी 51 लोकांचे सर्वेक्षण केले होते. मानवी व्यवहारामध्ये अनेकजण परोपकारी तटस्थपणाचे जीवन जगतात, पण अशा हिरशचंद्राच्या वंशजांना मात्र नेहमीच दु:ख आणि वेदनांचा त्रास सहन करावा लागतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.



Share this Story:

Follow Webdunia marathi