Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जबरदस्तीनं लग्न लावण्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर

जबरदस्तीनं लग्न लावण्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर
, मंगळवार, 23 जून 2015 (14:16 IST)
ब्रिटनमध्ये राहून जबरदस्तीनं लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा दुसरा क्रमांक लागतोय, असं आता समोर आलंय. या गुन्ह्यात पहिल्या नंबरवर आहे ‘पाकिस्तान’. 
 
ब्रिटनमध्ये एका वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जबरदस्तीनं लग्न लावून देणं या कृत्याला ‘गुन्हा’ ठरवलंय. इथल्या ‘फोर्स्ड मॅरिज युनिट’नं (एफएमयू) दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वेगवेगळ्या देशांशी निगडित असलेली प्रकरणं पाहिलीत. 
 
यामध्ये पाकिस्तान (38.3 टक्के), भारत (7.8 टक्के), बांगलादेश (7.1 टक्के), अफगाणिस्तान (3 टक्के), सोमालिया (1.6 टक्के), तुर्की (1.1 टक्के) आणि श्रीलंका (1.1 टक्के) या देशांशी निगडित लोकांचा जबरदस्तीनं विवाह लावून देण्याचा कल असतो असं एफएमयूनं म्हटलंय. 
 
हिंसाचार आणि शोषण प्रकरणांना रोखण्याशी संबंधित विभागाचे मंत्री कॅरेन ब्रॅडली यांच्या म्हणण्यानुसार, पीडितांना योग्य पद्धतीनं सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही जबरदस्तीनं लग्न लावून देणं हा गुन्हा ठरवला. शिवाय यातून अशी कृत्यं संपूर्णत: अस्वीकार्य आहेत आणि ब्रिटनमध्ये हे खपवून घेतलं जाणार नाही, असाही संदेश यातून गेला. ब्रिटनमधल्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीचं त्याच्या मर्जीविरुद्ध लग्न लावणं किंवा त्याला भाग पाडणं हा दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi