Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिप्रेशनमधून बाहेर पडा

डिप्रेशनमधून बाहेर पडा
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2015 (15:52 IST)
सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय.. जुन्या पिढीला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, तुम्हाला जर तणावामधून बाहेर पडायचं असेल तर आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत प्रत्यक्ष बोलण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला तयार राहायला हवं.. फोन, व्हॉटस् अँप आणि ई-मेलवर आपल्या मित्रांशी संवाद न साधता त्यांना प्रत्यक्ष भेटा.. आणि त्यांच्याशी संवाद साधा..ओरेगन हेल्थ अँन्ड सायन्स युनिव्हर्सिटीच्या शोधकत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जे लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना नियमितपणे भेट देत राहतात त्यांच्यात तणावाची लक्षणं खूपच कमी प्रमाणात आढळलीत.. हेच प्रमाण एकमेकांच्या ‘टच’मध्ये राहण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी’चा वापर करणार्‍यांत मात्र कमी होतं. समोरासमोर बसून एकमेकांशी संवाद साधल्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं संशोधनकर्त्यांयच म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi