Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तासन्तास विचारात गुंतलेलेच हुशार असतात

तासन्तास विचारात गुंतलेलेच हुशार असतात
शारीरिक स्वरुपात कमी क्रियाशील असणारे आणि नेहमी विचारात गुंतलेले लोक जास्त हुशार असतात. अर्थात अशा लोकांची आयक्यू लेव्हल जास्त असते, असा समज आहे. अमेरिकेच्या एका संशोधनामुळे हा समज खरा ठरण्यास बळ मिळालं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका विद्यापीठात हे संशोधन करण्यात आलं. संशोधकांनी संशोधनासाठी 30-30 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. एका ग्रुपमध्ये सतत विचारात हरवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, तर दुसर्‍या ग्रुपमध्ये कमी विचार करणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश होता. 
 
एक ग्रुप कमी क्रियाशील असल्याचं एका आठवडय़ानंतर निष्पन्न झालं. सतत विचार करणार्‍या विद्यार्थ्यांचा हा ग्रुप होता. कमी विचार करणारे लोक लवकर कंटाळतात, ज्यामुळं त्यांना शारीरिक क्रियांद्वारे वेळ घालवावा लागतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. सतत विचार करणार्‍या लोकांना संशोधकांनी सल्लादेखील दिला आहे. शारीरिकदृष्टय़ा क्रियाशील नसणं हे आयक्यू लेव्हल चांगली असण्याचे संकेत असतात. मात्र यामुळे शारीरिक समस्यादेखील उद्भवू शकतात, असं संशोधकांनी सांगितलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गाय फक्त दूध देते : लालू प्रसाद