Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नासामधील शास्त्रज्ञांना आढळला सूर्याजवळ पृथ्वीसारखाच ग्रह

नासामधील शास्त्रज्ञांना आढळला सूर्याजवळ पृथ्वीसारखाच ग्रह
, शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (12:21 IST)
नासामधील शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह सूर्याजवळ फिरताना आढळला असून हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ दिसला असून त्यावर अंधुक प्रकाशही असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
अंतराळ संशोधनात ही महत्त्वाची घटना असल्याने आता या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करणार आहेत.
 
सध्या 31 शास्त्रज्ञांची टीम या ग्रहाबद्दल संशोधन करत आहे. प्रॉक्झिमा बी असे नाव या ग्रहाला देण्यात आले आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 1.3 मोठा असून ङ्खक्त 11 दिवसांमध्ये सूर्याचे परिभ्रमण करतो. 
 
तसेच हा ग्रह एकटा भ्रमण करत नसल्याचा अंदाजही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. हा ग्रह सर्वप्रथम 2013 साली दिसून आला होता, त्याबद्दल आता नवीन खुलासे समोर आल्याने डिस्कव्हरीने 100 दशलक्ष डॉलरची मोहीम आखण्याचे ठरवले आहे. 
 
पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कुठल्या ग्रहावर वातावरण आणि पाण्याचा अंश आहे का याचाही शोध संशोधक बर्‍याच काळापासून घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बलुचिस्तानमध्ये फडकला तिरंगा