Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बधीर मुलांच्या चेहेऱ्यावर फुलणार हास्य !

बधीर मुलांच्या चेहेऱ्यावर फुलणार हास्य !
नागपूर , बुधवार, 10 ऑगस्ट 2016 (17:59 IST)
स्वातंत्र्य दिनी सेवा ऑटोमोटिव्हतर्फे सामाजिक उपक्रम
स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ समाजातील बधीर मुलांना जाणवून देण्यासाठी नागपूर स्थित सेवा ऑटोमोटिव्ह झटत आहे. मारुती सुझुकी गाड्यांचे डीलर असलेली सेवा ऑटोमोटिव्ह स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत 1300 बधीर मुलांना श्रवणयंत्र देऊन समाजाप्रती बांधिलकी जपणार आहे. हा उपक्रम गंगाधरराव चिटणवीस सेन्टर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे 12 आणि 13 ऑगस्टला सामाजिक, राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. 
 
जीवन सुंदर आहे, मात्र जगण्याचा खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपण आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचा आनंद दृक्श्राव्य पद्धतीने घेऊ शकू. दिसणे, बोलणे आणि ऐकणे या 3 क्रियांमधील एखादी जरी गोष्ट देवाने आपल्या दिली नसली तर हेच जगणं असह्य होऊ शकतं ! बधीर मुलांना ऐकण्याचे वरदान देण्यासाठी सेवा ऑटोमोटिव्ह गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. सेवा ऑटोमोटिव्हने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बधीर मुलांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. अमेरिका स्थित संस्था ‘ स्टारकी फाऊंडेशन श्रवणयंत्रांचे उत्पादक असून सेवा ऑटोमोटिव्ह आणि स्टारकी यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा उपक्रम राबविला जात आहे. सेवा ऑटोमोटिव्हचे तरुण आणि तडफदार सीईओ आदित्य बाफना यांचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची मोलाची साथ यामुळे सलग 3 वर्ष हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना आदित्य बाफना म्हणाले की, "आम्ही 1300 बधीर मुलांना श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करणार आहोत. बालपणापासूनच ऐकू ना शकणारी ही मुलं आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यांना ऐकण्यासाठी श्रवणयंत्र देऊन आम्ही आमची समाजाप्रती असलेली बांधिलकी राखत आहोत." 
 
विल्यम एफ. ऑस्टिन यांनी 1984 रोजी स्टारकी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. " एकट्याने बदल घडत नाही, एकत्र येऊन आपण जग बदलू शकतो" या तत्वावर ही संस्था कार्यरत आहे. या पवित्र कार्यात सेवा ऑटोमोटिव्हची स्टारकी फाऊंडेशनला नेहेमीच साथ राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी?