Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांना आवडतात खुशामतखोर पुरुष

महिलांना आवडतात खुशामतखोर पुरुष

वेबदुनिया

खुशामत करणार्‍या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात तर शारीरिक ठेवण आणि उत्तम आरोग्य असणार्‍या महिलांकडे पुरुष आकर्षित होतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आपल्या सौंदर्याची स्तुती करणारा पुरुष आवडतो, असे या संशोधनात बहुतांश महिलांनी सांगितले.

पेन स्टेन युनिव्हर्सिटीत प्रोफेसर गॅरी चिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या विविधरंगी पंखांनी मादीला आकर्षित करतात त्या प्रमाणेच पुरुष आकर्षक पेहराव आणि आलिशान कार यांच्या माध्यमातून स्त्रीयांना आकर्षित करतात.

पुरुषांच्या खुशामतखोरीमुळे महिलांना त्यंच्याबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागते. त्याचा स्वभाव आक्रमक नसेल आणि आपल्याला तसेच होणार्‍या मुलांना त्याचा त्रास नाही, याची महिलांना खात्री वाटते. साहजिकच त्या अशा पुरुषांकडे आकर्षित होतात, असे प्रो. चिक म्हणाले.

253 जणांकडे याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात168 पुरुष तर 89 महिलांचा समावेश होता. या सगळ्यांचे वय 18 ते 26 दरम्यान होते. पुरुषांचा मस्तीखोर व आनंदी स्वभाव, खुशामतखोरी महिलांना आकर्षित करतात. तर शारिरीक आकर्षण, उत्तम आरोग्य याला पुरुष प्राधान्य देतात, असे निष्कर्ष समोर आला आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi