Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणूस 39 दिवसांत पोहोचणार मंगळावर

माणूस 39 दिवसांत पोहोचणार मंगळावर
, गुरूवार, 9 एप्रिल 2015 (15:26 IST)
मंगळावर जाण्यासाठी माणसांचा नियमित प्रवास सुरू होणे आता काही वर्षाचाच प्रश्न राहिला आहे. मात्र हा प्रवास अधिक वेगाने म्हणजे केवळ 39 दिवसांतच पूर्ण करता यावा यासाठी एक खास इंजिन बनविले जात असून या प्रकल्पासाठी नासाने संबंधित कंपनीला तीन वर्षासाठी 1 कोटी डॉलर्सचे अनुदान दिले असल्याचे समजते.

अमेरिकेच्या टेक्सास भागातील वेबस्टर अँड एस्ट्रा रॉकेट कंपनीतर्फे वस्मिर इंजिन विकसित केले जात आहे. या इंजिनात पारंपरिक इंधनाऐवजी प्लाझ्मा गॅसचा वापर केला जात आहे. कंपनीचे सीइओ फ्रँकलीन चंग हे स्वत: अंतराळवीर असून त्यांनी आतापर्यंत सातवेळा अंतराळ प्रवास केला आहे. ते सांगतात, प्लाझ्मा वापरले जाणारे वस्मिर रॉकेट वास्तविक प्रक्षेपणासाठी वापरले जात नाही. मात्र गॅस प्लाझ्माचा वापर करून आम्ही इंजिन विकसित करत आहोत. हे इंजिन रेडिओ लहरींच्या मदतीने प्लाझ्माला अत्यधिक तापमानावर गरम करते. चुंबकीय क्षेत्र या प्लाझ्माला इंजिनाच्या मागच्या बाजूने बाहेर ढकलते व त्यामुळे जोरदार धक्का बसून वेगाने इंजिन पुढे जाते. अंतराळातील प्रवासासाठी हे इंजिन 3 वर्षात वापरात आणले जाईल व त्याच्या साहाय्याने मंगळ, चंद्रावरची सफर थोड्या दिवसांत पूर्ण करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi