Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मानवासारखेच दिसणारे एलियन्स

मानवासारखेच दिसणारे एलियन्स
, गुरूवार, 30 जुलै 2015 (13:11 IST)
लंडन- ब्रिटनमधील एका उत्क्रांती तज्ज्ञाने परग्रहवासीयांच्या अस्तित्वाच्या शक्यतेला दुजोरा देताना ते हुबेहूब मानवाप्रमाणे असू शकतात, असाही अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाच्या शक्यतेला आणखी बळ मिळत असून, एक दिवस नक्कीच आपण परग्रहवासीयांपर्यंत पोहोचू असा आशावाद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
परग्रहवासीयांच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता येत नसून ते हुबेहूब मानवाप्रमाणेच असू शकतात, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. त्यांना मानवाप्रमाणेच हात, पाय, डोके व मेंदू असू शकतो, असाही तर्क त्यांनी व्यक्त केला आहे.
 
त्यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार ज्या गोष्टी पृथ्वीवर लागू होतात त्या सूर्यमालेत इतर ठिकाणीही लागू होऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi