Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या पहिल्या डॉनचा बंगला 100 कोटींच्या घरात

मुंबईच्या पहिल्या डॉनचा बंगला 100 कोटींच्या घरात
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (12:04 IST)
पेडर रोड येथील मुंबईचा पहिला डॉन असलेल्या हाजी मस्तान याच्या आलिशान बंगल्याचा लिलाव होणार असून आजच्या बाजारभावाने या बंगल्याची किंमत अंदाजे 90 ते 100 कोटींच्या घरात आहे. मात्र, या लिलावाला खो बसला आहे.
 
हाजी मस्तानच्या तीन मुली, हाजी मस्तानचा राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची मुले याच्यामध्ये या बंगल्याच्या मालकीवरुन वाद होता. पण, आता मात्र हाजीचा दत्तक पुत्र सुंदरने या वादात उडी घेऊन बंगल्याच्या लिलावात खो घातला आहे. हाजी मस्तान हा कधीही गोळी न चालवणारा, कधीही ड्रग्ज आणि हत्यारांचे अवैध व्यवहार न करणारा तरी संपूर्ण मुंबईवर आपले वर्चस्व ठेवणारा कुप्रसिद्ध डॉन होता. त्याचा जास्तीत जास्त पैसा हा सोन्याच्या काळ्या बाजारातून आला होता. त्याची ओळख ‘गरिबांचा रॉबिनहूड’ अशीही होती.
 
हाजी मस्तानचा 1994 साली मृत्यू झाला. आपल्या मृत्यूआधी त्याने आपला बंगला त्याच्या तीन लेकींना म्हणजेच कमरुनिस्सा, मेकरुनिस्सा आणि शमशाद तसेच आपला राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची तीन मुले शकील, समीर आणि रेहाना या तिघांना दिला. पण, पुढे त्यांनी खोटय़ा पॉवर ऑफ अँटर्नीमार्फत या बंगल्यावर ताबा मिळवल्यामुळे मस्तानच्या मुली त्याच्याविरोधात पोलिसात गेल्या. करीमच्या मुलांना पोलिसांनी अटकही केली होती. पुढे त्यांच्यात समेट होऊन हा बंगला विकून त्याचे हिस्से वाटून घेण्याचे ठरले.
 
आता या बंगल्याचा लिलाव होणार इतक्यातच हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर मस्तान याने या बंगल्याच्या लिलावाला विरोध केला आहे. हा बंगला म्हणजे माझ्या वडिलांची आठवण असून त्याचा लिलाव होऊ देणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे. या वादात आता तिसर्‍या पक्षाचा समावेश झाल्याने त्यात ट्विस्ट आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi