Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॅग्नेट मॅन! शरीराला चिकटतं लोखंड (पहा व्हिडिओ)

मॅग्नेट मॅन! शरीराला चिकटतं लोखंड (पहा व्हिडिओ)
हॉलिवूड सिनेमाच्या आयरन मॅनबद्दल तर अधिकश्या लोकांना माहीत असेल पण खरोखरचा मॅग्नेट मॅन कोणी पाहायला नसेल. एक असा व्यक्ती ज्याच्या शरीराला लोखंड चिटकून जातं. डॉक्टराने याला आश्चर्य मानले आहे.
 
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील ढाना गाव रहिवासी अरुण रायकवार सध्या चर्चेत आहे. त्यांच्या दुर्मिळ क्षमतेमुळे ते पूर्ण क्षेत्रात कुतूहलाचा विषय आहे. यांचे आकर्षक आणि यांच्या शरीरातून निघणारी चुंबकीय शक्ती.
येथील लोकांप्रमाणे अरुण यांचे शरीर मागील दहा- बारा दिवसापासून चुंबकासारखे कार्य करीत आहे. लोखंडाची प्रत्येक वस्तू त्यांच्या शरीराला चिकटून जाते. 50 वर्षाचे अरुण फोटोग्राफर आहे. सामान्य जीवन जगत असताना अचानक त्यांना तेव्हा बदल जाणवला जेव्हा त्यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेला किल्ल्यांचा गुच्छा त्यांना चिकटून गेला आणि खूप प्रयत्न केल्यावर सुटला.
 
यानंतर त्यांनी आपल्या शरीरावर खिळे, आणि इतर वस्तू चिटकवून पाहिल्या तर सर्व चिकटायला लागल्या. त्यांनी लोखंड्याच्या इतर वस्तूंना हात लावत्याक्षणी त्या चिकटायला लागल्या. पाहता-पाहता ही बातमी पूर्ण क्षेत्रात पसरली.
 
अरुण यांनी सांगितले की त्यांच्या शरीराला खिळे, अडकित्ता, चाकू, वस्तरा आणि चमचे असे चिकटून जातात जसे चुंबकाला लोखंड. आता अरुणाला बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
 
 
डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या जीवनात अशाप्रकाराच्या पहिला केस बघितला आहे. हे रोग नसून चमत्कार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाही कापले जाणार जाऊदचे पाय, छोटा शकील म्हणाला भाई एकदमफिट