Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या बर्गर गर्लसाठी लागतात रांगा

या बर्गर गर्लसाठी लागतात रांगा
, शनिवार, 30 जुलै 2016 (18:05 IST)
तैवान येथील सु काऊशुंग शहरातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट सध्या सोशल मीडियावर बरेच गाजते आहे. या रेस्टॉरंटची कीर्ती येथे मिळत असलेल्या विशिष्ट पदार्थामुळे नाही तर ती आहे या रेस्टॉरंटच्या काउंटरवर काम करणार्‍या एका सुंदर मुलीसाठी. सुवेहान नावाची ही सेल्सगर्ल. तिच्याकडे जो कुणी पाहतो तो पाहातच राहतो कारण ती अगदी आयडील बार्बी डॉलसारखीच दिसते. सुवेहानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
 
ती ज्या काउंटरवर काम करते तेथे ग्राहकांची भली मोठी रांग असते, ती तिच्याच हातून आपल्याला बर्गर मिळावा यासाठी. तिला बर्गर गर्ल असेही नाव मिळाले आहे. 
 
शिवाय ग्राहक तिला वेईवेई, हेतून या नावांनीही पुकारतात. गेल्या काही महिन्यांपासून सुवेहानचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत. तिचे इंस्टाग्राम अकाउंटही आहे आणि आजमितीला या अकाउंटवर तिचे 1 लाख 11 हजार फॉलोअर्स आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातमध्ये टोलमुक्ती