Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या मुलाचे पहिलेच नाव आहे 40 शब्दांचे

या मुलाचे पहिलेच नाव आहे 40 शब्दांचे
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (15:44 IST)
काही वर्षापूर्वी आलेल्या धमाल चित्रपटातला दिवंगत अभिनेते विनय आपटे यांचा प्रसिद्ध संवाद तुम्हाला आठवतो का? एक दक्षिण भारतीय अय्यर नावाची भूमिका ते साकारत असतात तेव्हा त्यातला एक हिरो त्यांना त्यांचे नाव विचारतो. मग ते आपले नाव सांगायला सुरु करतात अय्यर. 
 
वेणुगोपाळ अय्यर... मुत्तुस्वामी वेणुगोपाळ अय्यर.. चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाळ अय्यर, परंबतुर चिन्नस्वामी वेणुगोपाळ अय्यर  आणि पुढे अगदी प्रवास संपेपर्यंत काही त्यांचे नाव सांगून पूर्ण होत नाही. अशीच आणखी एका पेनची जाहिरात आहे त्यातही पूर्ण पान भरेल इतके लांबलचक नाव एका व्यक्तीचे असते. आता तुम्ही विचार करा इतके लांबलचक नाव कोणी आपल्या मुलाचे कशाला बरे ठेवेल त्यामुळे केवळ विनोदनिर्मिती म्हणून हे दाखवले असेल हे तुम्हा आम्हाला माहिती. पण असेही काही लोक असतात ज्यांना आपल्या मुलाचे नाव लांबलचक ठेवायला आवडते. एक मुलगा आहे ज्याची एक दोन नाही तर तब्बल चाळीस नावे आहेत. आता कल्पना करा चाळीस नावे असलेला हा मुलगा आपले नाव कसे लक्षात ठेवत असेल म्हणजेच ‘ए तुझे नाव का’ असे विचारल्यास आपले नाव सांगायला त्याला किती वेळ लागत असेल. तेही जाऊद्या फक्त पहिले नाव लिहायचे झाले तरी त्याच्या वहीची दोन पाने तर अशीच भरत असतील. 
 
मूळचा फिलिपीन्सच्या असलेल्या रात्झिल नावाच्या मुलाला 40 नावे आहेत. सगळ्यात मोठे नाव असल्याचा विक्रमच या मुलाच्या नावे जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. रात्झिल फक्त अठरा वर्षाचा आहे. या मुलाचे रात्झिल टिमशेल इस्माइल झेरूबाब्बाले झाबुद झामरी असे लांबलचक नाव सुरू होते हे नाव पूर्ण बोलायचे झाले तर दम लागेल की विचाराची सोय नाही. रात्झिलच्या आजोबांनादेखील अशीच नावे ठेवायची सवय होती. त्यांना चार मुले होती त्यांचीही नावे अशीच ठेवली होती रात्झिलच भावंडांची नावेही अशीच आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MNSचे अल्टीमेटम- 48 तासात भारत सोडा पाकिस्तानी अॅक्टर