Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे सर्प दंशाने येत नाही मृत्यू

येथे सर्प दंशाने येत नाही मृत्यू
, बुधवार, 3 ऑगस्ट 2016 (15:54 IST)
भारतामध्ये अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. येथील लोकं अश्या विचित्र गोष्टींवर विश्वासही ठेवतात ज्या इतर देशातील लोकांसाठी आश्चर्यकारक किंवा मजेदार असतात. विचित्र गोष्टींवर विश्वास करण्यामागे कारणही डोळ्याने बघितलेलं, अनुभवलेलं असतं त्यामुळे शंका येतच नाही.
 
बिहारच्या एका गावाची विशेषता आहे की येथील लोकांना सापाने दंश मारल्यावरही त्यांचा मृत्यू होत नाही. तो साप विषारी असला तरी त्यामुळे गावातील कोणीही मृत्युमुखी पडत नाही.
येथील लहान मुलेदेखील साप बघितल्यावर त्याला पकडण्यासाठी धावतात. कोणीही सापाला घाबरत नाही. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्याच्या मुख्यालयाहून 23 किमी दूर हे गाव आहे ज्याचे नाव आहे सिंधिया घाट. या गावाचा सापांशी घनिष्ठ संबंध आहे. गावात राहणारे लोकं दिवसभर सापांशी खेळतात आणि खेळता- खेळता अनेकदा सापांनी मुलांना दंश मारले आहे परंतू मुलांवर त्यांचा काही प्रभाव होत नाही. येथील रहिवाशांप्रमाणे गावातील कोणत्याही व्यक्तीची सर्प दंशामुळे मृत्यू झालेली नाही कारण गावावर देवी भगवतीचा आशीर्वाद आहे.
 
या गावाचे लोकं नागपंचमीचा सण खूप धूमधामने साजरा करता. एक विचित्र प्रथेनुसार पूजेनंतर गावातील प्रत्येक माणूस दहीसोबत कडुनिंबाची पाने खातो. असे केल्याने सदैव देवाचा आशीर्वाद मिळत राहतो असा गावकर्‍यांचा विश्वास आहे.
 
बिहार आणि झारखंड येथे असे अनेक गाव आहे ‍जिथले लोकं पैसे कमाविण्यासाठी साप पकडून सार्वजनिक प्रदर्शन करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आत्मा शरीरातून बाहेर निघाली, CCTV मध्ये कॅप्चर! (व्हिडिओ)