Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वडा पावला आता जागतिक ओळख

वडा पावला आता जागतिक ओळख
, सोमवार, 27 जून 2016 (10:40 IST)
लहानांपासून मोठय़ांपर्यंत, गरिबांपासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वाना आवडणारा आणि पिझ्झा, बर्गर, फ्रँकी, रोल्स या फास्टफूडच्या जमान्यातही लोकप्रिय असलेला महाराष्ट्रीयन ‘स्ट्रीट फूड’ वडापावला आता जागतिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत भेटीवर असलेले जागतिक कीर्तीचे दुसरे ख्रिस्ती आध्यात्मिक गुरु डॉ. जेफ्री महाबना यांच्यासह त्यांच्या टीमला महाराष्ट्राच्या स्ट्रीट वडापावने भुरळ घातली. वडापावला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ‘इंडियन वडापाव गव्हर्नन्स कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली होती. ‘मिशन सेफ फूड इंडिया’ आणि ‘इंडियन वडापाव गव्हर्नन्स कौन्सिल’ने आयोजित केलेल्या ‘फूड टेस्टींग सेशन’साठी खास डॉ. जेफ्री महाबना आणि त्यांच्या टीमला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते. 
 
‘मिशन सेफ इंडिया’चे प्रमुख सल्लागार सानी अवसरमल, उद्योजक बाहरी मल्होत्रा, ‘अँडव्हेटीस्ट मीडिया’चे प्रमुख डॉ. एडीसन समराज उपस्थित होते. ‘डॉ. जेफ्री महाबना यांना देण्याच्या वडापावमध्ये पावात बदल करण्यात आला. बेकरीमध्ये बेक केलेला पाव न वापरता पाच प्रकारातील पाव आणि त्यासोबत शुद्ध तेलामध्ये तळलेला बटाटेवडा हा ‘हटके वडापाव’ त्यांना चाखायला मिळाला,’ अशी माहिती सानी अवसरमल यांनी दिली. वडापावला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक कीर्तीच्या व्यक्तींना बोलविणार आहोत, असे कौन्सिलचे अध्यक्ष रणजीत तळे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग