Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वय 11 वर्षे, आईनस्टाईनएवढा आयक्यू

वय 11 वर्षे, आईनस्टाईनएवढा आयक्यू
थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिङ्खन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. त्यांच्याबाबत बुद्धिमत्तेची चर्चा करताना लोक आजही थकत नाहीत. महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा एक हिरा गवसलाय जो थेट या शास्त्रज्ञांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
 
अखिलेश चांदोरकर नावाच्या अवघ्या 11 वर्षाच्या मुलाचा आयक्यू थेट आईनस्टाईन इतका म्हणजे 160 इतका आहे. नागपुरातल्या जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अखिलेशला आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च आयक्यू असलेल्या व्यक्तींची संस्था ऑक्सङ्खर्डच्या ‘मेन्सा’ संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलं आहे. 
 
थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन आणि स्टिङ्खन हॉकिन्स या दोघांचाही आयक्यू 160 एवढा होता. इंटेलिजन्स कोशन्ट अर्थात आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक असे म्हणतात. माणसाच्या बौद्धिक पातळीची क्षमता दर्शवणारं हे एक मापक आहे. सर्वसाधारणपणे माणसाचा आयक्यू 70 ते 130 या दरम्यान असतो. आयक्यू 130 च्या वर असणारी व्यक्ती जिनियस किंवा गॉड गिफ्टेड मानली जाते. अखिलेशचं प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुस्तकांत रमणारा, मित्रांसह धमाल करणारा, प्रत्येक खेळाचा आनंद घेणार्‍या अखिलेशमध्ये नक्कीच काही तरी बात आहे, हे त्याच्या आई-वडिलांना त्याच्या बालपणीच कळलं होतं. 
 
आयक्यू 160 असणं ही काही साधी गोष्ट नाही, खुद्द अखिलेशचाच त्यावर विश्वास बसत नाहीये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आफ्रिकी देशांच्या दौर्‍यासाठी पंतप्रधान मोदी रवाना