Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरिद्वारचे गंगाजल ऑनलाइन मिळवा

हरिद्वारचे गंगाजल ऑनलाइन मिळवा
सर्वात पवित्र मानले जाणारे गंगाजल घेण्यासाठी आता तुम्हाला उत्तर प्रदेशात जाण्याची गरज नाही. पोस्टाच्या माध्यमातून भाविकांच्या घरी गंगाजल पोहोचवण्याची नवी योजना केंद्र सरकार लवकरच सुरू करणार आहे. ऑनलाइन बुकिंग करुन हरिद्वार आणि हृषीकेषमधील गंगाजल घरपोच पाठवणे शक्य होणार आहे. 
दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भात घोषणा केली. या गंगाजलसाठी नागरिकांना किती रुपये मोजावे लागतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. इतकेच नाही, तर ही योजना कधी चालू होणार याबद्दलही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमएचसीईटी ; निकाल डीएमईआरच्या वेबसाईटवर