पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून 20 मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिन' म्हणून पाळला जातो. जगभरात चिमण्यांची संख्या कमी होत आहे. भारतात माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. पण बदलते वातावरण, वाढणारे प्रदुषण यांमुळे चिमण्यांना धोका निर्माण झाला आहे. म्हणून जागरूकता निर्माण करण्यसाठी 20 मार्च हा 'जागतिक चिमणी दिन' म्हणून साजरा करतात. एकूण 26 जातींच्या चिमण्यांची नोंद जगभरात आहे.
तसेच भरतात 5 प्रजातींच्या चिमण्या आढळतात व त्यामध्ये स्थलांतर करणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. तसेच जगामध्ये देखील 24 प्रकारच्या चिमण्या आढळतात. बहुतांश प्रजातींची यापैकी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. 13 व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. ही परिषद गुजरातच्या गांधीनगर येथे 2020 मध्ये झाली होती. हा अहवाल देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनीसिटिझन सायन्स या संकल्पनेचा वापर करून तयार केला आहे.
तसेच सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांनी हा निष्कर्ष काढला. पक्षांच्या 867 प्रजातींचा समावेश प्रकाशित अहवालात करण्यात आला होता. गेल्या 25 वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट या अहवालामध्ये नोंदविली गेली आले. तसेच या अहवालात गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल 79%घट झाल्याचेही म्हटले आहे. अभ्यासकांचे मत आहे की कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक आहे.
शहरी भागातून मोठ्या प्रमाणात चिमण्यांची संख्या कमी झाली असून चिमण्यांचे प्रमाण ग्रामीण भागातही कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. चिमण्यांची घटती संख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. विविध परिसंस्थांवर चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम दिसत आहे. तसेच चिमण्याची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम शेतातील पिकांवर देखील झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असतात. पण आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून पिक टिकून राहण्यासाठी हानिकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे. म्हणून चिमणीच्या संवर्धनासाठी उपाय सांगण्यात आले. नैसर्गिक परिवास चिमण्यांच्या वावरासाठी निर्माण करणे. तसेच लोकांना चिमणी वाचवण्यासाठी जागृत करने, पर्यावरणाचे महत्व समजवून सांगणे, म्हणून याकरिता 20 मार्च रोजी 'जागतिक चिमणी दिन' साजरा करतात.
Edited By- Dhanashri Naik