Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

4 अब्ज 21 कोटी रुपयांचा हिरा

4 अब्ज 21 कोटी रुपयांचा हिरा
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (12:54 IST)
जगातील सर्वात महागडय़ा अनकट हिर्‍याची विक्री करण्यात आलेली आहे. स्वित्झर्लड येथील दागिने निर्मितीमधील नामवंत कंपनी डे ग्रिसोगोनो या कंपनीने हा हिरा विकत घेतला आहे. दुबईतील कंपनी नेमेसिस इंटरनॅशनलने या हिर्‍याचा लिलाव केला असून ग्रिसोगो या कंपनीने तब्बल 63 दशलक्ष डॉलरला या हिर्‍याची खरेदी केली आहे. 
 
हा हिरा 2015 मध्ये कॅनडातील हिर्‍यांचे उत्खनन करणारी कंपनी लुकारा डायमंड बोत्सवाना येथील खाणीत सापडला होता. या हिर्‍याचे वजन 813 कॅरट असून लांबी 6 सेंटीमीटर इतकी आहे. 
 
या हिर्‍याचे नाव ‘कॉन्स्टेलेशन’ असे ठेवण्यात आले होते. हा हिरा अनकट असून त्याला पैलू पाडण्याचे काम काही महिने चालणार आहे. पैलू पाडल्यानंतर या हिर्‍याचे वजन 300 ते 350 कॅरट इतके असणार आहे. पैलू पाडल्यानंतर जगातील सर्वोत्तम हिरा म्हणून या हिर्‍याची गणना होणार आहे. उणीवरहित हिरा असे या हिर्‍याचे वर्णन केले जात आहे. 
 
या हिर्‍याची भारतीय रुपयांतील किंमत ही तब्बल 4215011850 इतकी (4 अब्ज 21 कोटी 50 लाख 11 हजार 80 रुपये) आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातेत सापडला नवीन रक्तगट