Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम

7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम
जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये रविवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. तब्बल 7 हजार 548 वादकांनी एका फुटबॉल स्टेडियमवर एकत्र येऊन सर्वात मोठय़ा ऑर्केस्ट्रा वादनाचा विक्रम केला. 
 
एका 28 वर्षीय संगीत शिक्षकानं हा सगळा लवाजमा गोळा केला. याआधी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये 7 हजार 224 वादकांनी सर्वात मोठय़ा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला होता. 
 
त्यांचा विक्रम जर्मनीतल्या या खुल्या मैफलीत मोडीत काढण्यात आला. यापूर्वी असे रेकॉर्ड बनविण्यात आले आहे. मात्र 7 हजार 548 वादकांनी एकाचवेळी वादन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
हा विश्वविक्रम बनल्यामुळे या कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी कठोर परिश्रम घेतल्याचे कलाकारांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्न नासाडी टाळण्यासाठी ‘फूड दोस्ती’ अँप